Home धक्कादायक ब्रेकिंग :- लातूर-अंबाजोगाई रोड वर बस आणि ट्रकचा भीषण अपघात.

ब्रेकिंग :- लातूर-अंबाजोगाई रोड वर बस आणि ट्रकचा भीषण अपघात.

सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी.

न्यूज नेटवर्क :-

आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत.लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. (ST bus and truck collied each other in Beed) बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे.

Previous articleश्रद्धांजली :- सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी सिंधूताईं सपकाळ यांचा आदर्श ठेवावा.
Next articleखळबळजनक:- तर राज्यात दारूची दुकानें पण बंद होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here