Home चंद्रपूर बाप रे बाप ! दलविंदर कौर यांना जीवे मारण्यासाठी चक्क जादूटोणा?

बाप रे बाप ! दलविंदर कौर यांना जीवे मारण्यासाठी चक्क जादूटोणा?

निखत पटवालिया, वंदना वानखेडे या महिलांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात पुन्हा जादूटोणा सारखा गंभीर प्रकार घडला असून दलविंदर कौर या अविवाहित मुलीला जीवे मारण्यासाठी जादूटोणाचा वापर करून घरात निंबु व पूजा साहित्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकार नगर चंद्रपूर येथे हा प्रकार घडला असून याबाबत रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार दिल्यानंतर अर्जदाराच्या हातात केवळ एनसी देऊन मामला रफादफा करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया ही त्यांचे वडील सेवासिंग पटवालिया यांच्यासह आई सोबत सरकार नगर येथील घरी राहायचे. दरम्यान राहायचे दरम्यान तिचा भाऊ दलजितसिंग पटवालिया यांनी आंतरजातीय विवाह केल्याने तो काही दिवस बाहेर होता. त्यानंतर तो घरी आल्याने आईच्या नावाने असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर त्याला स्वतंत्र रहायला वडिलांनी संमती दिली होती,या वेळी सन 2016 ला तिच्या भावाने वडिलांची हत्या केली त्यामुळे त्याला आजीवन कारावास झाला असून जवळपास 4 वर्षाची सजा काटुन आल्यानंतर त्याला रामनगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत त्याला न येण्याचाआदेश न्यायालयाने दिला होता. मागील सन 2020 ला आई सुद्धा मरण पावली. त्यामुळे तिची वाहिनी व बाजूला अतिक्रमण करून राहणारी वंदना वानखेडे ह्या दोन महिलांनी पूर्ण घरावर ताबा मिळविण्यासाठी दलविंदर कौर या 26 वर्षीय मुलीसोबत भांडण करणे तिला जीवे मारण्यासाठी अनेक मांत्रिकाकडून पूजा अर्चा करणे सुरू असून जेल मधूनबाहेर असलेल्या तिच्या भावाकडून कधीही तिची हत्त्या होण्याची भीती नाकारता येत नाही.

दलविंदर कौर हिच्या नावाने असलेल्या घरावर कब्जा करण्यासाठी तिच्या वहिनीने घराचे वरील मजल्यावर असलेल्या घराला कुलूप लावले. खरं तर स्त्रीधन कायद्यानुसार आई कडून मिळालेल्या संपतीवर मुलीचाच अधिकार आहे त्यामुळे तिच्या आईने तिच्या नांवावर सन 2015 कब्जा पावती दिली व सन 2019 ला तिच्या नावाने वारसान हक्क (मृत्युपत्र) लिहून दिले त्यामुळे स्त्रीधन हक्कानुसार ती खरी वारसदार झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here