Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे जेष्ट नेते रमेश राजूरकर यांच्या घरी...

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे जेष्ट नेते रमेश राजूरकर यांच्या घरी भेट.

वरोरा व भद्रावती येथे उमडला महाराष्ट्र सैनिक व राजप्रेमींचा जनसैलाब. मनसे पक्ष संघटनेला मिळाली बळकटी.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा बहुचर्चित दौरा हा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरला असून इतिहासात पहिल्यांदाच कुण्या पक्ष प्रमुखांची त्यांच्या उमेदवारांचा घरी भेट होण्याचा हा पहिला प्रसंग वरोरा वाशीयांनी यांची देही यांची डोळा पाहिला आहे. काल  दिनांक १९ सप्टेंबरला सायंकाळी ६.२० ला मनसे स्थानिक जेष्ट नेते रमेश राजूरकर यांच्या स्नेहनगर येथील घरी चक्क मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे भेटीस गेल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या व मनसे कार्यकर्त्यांत मोठा जोश निर्माण होऊन पक्षाच्या संघटन बांधणीला उभारी मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्य जनतेत उमटल्या आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यात वरोरा येथे रमेश राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट घेतील अशा बातम्या आल्या असतांना अचानक कार्यक्रमात बदल झाला होता व आता ते येथील की नाही ?की सरळ चंद्रपूर ला जातील ? याबद्दल शंका निर्माण झाली होती पण राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या प्रयत्नाने अखेर राजसाहेब ठाकरे हे राजूरकर यांच्या घरी आल्याने व त्या दरम्यान प्रचंड गर्दी झाली असल्याने हया विधानसभा क्षेत्रात मनसेला मोठी ताकत मिळाली आहे.

भद्रावती येथे सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी व राजप्रेमींनी तुफान गर्दी केली होती सोबतच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात चंद्रपूर नागपूर रस्त्यांवर बैनेर झेंडे व कार्यकर्त्यांच्या गळ्यांत दुपट्टे सगळीकडे दिसत असल्याने हे क्षेत्र मनसेमय झाले होते.

या दौऱ्याच्या स्वागताच्या तयारीसाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव डहाने. तालुका सचिव कल्पक ढोरे. मुकुल राजूरकर, भद्रावती तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर शहर अध्यक्ष अजय महाकुळकर. युगल ठेंगे वरोरा तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी. राम पाचभाई. अरुण महल्ले. विनोद खडसंग. सत्त्या मांडवकर, कुणाल गौरकार ,राजेंद्र धाबेकर श्रीकांत तळवेकर, संदीप मोरे, निलेश चौधरी. यादव उइके मनसे महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा मंदा वरखडे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here