Home वरोरा शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी व पिकाविम्याचे पैसे त्वरित द्या.अन्यथा आंदोलन.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी व पिकाविम्याचे पैसे त्वरित द्या.अन्यथा आंदोलन.

मनसेचा मुख्यमंत्री शिंदे यांना उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून इशारा. 

वरोरा :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतापिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनातर्फे त्वरित आर्थिक मदत देण्यात आली नसल्याने व पंतप्रधान पीक विम्यासह प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आज दिनांक 23 सप्टेंबरला निवेदन देण्यात आले जर शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासह वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा प्रशासनाने केले मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून जी हेक्टरी 13700 रुपये जाहीर झाले ते मिळाले नाही, सोबतच पंतप्रधान पीक विमा योजनेतर्गत शेतकऱ्यानी विमा भरला असताना सुद्धा तो त्यांना मिळाला नाही, त्यामुळे खरीप हंगाम हा शेतकऱ्यांचा वाया गेला व येणारा रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्याकडे बियाण्यासाठी पैसे नसल्याने वाया जाण्याच्या उंबरठ्यावर आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यातच ठाकरे सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली ती पण दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची शासन प्रशासन एक प्रकारची थट्टा करत असल्याने या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मैदानात उतरली असन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याचे पैसे देण्यात यावे व प्रोत्साहन राशी बैंक खात्यात जमा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात केला आहे,

या निवेदनात वरोरा चिमूर या सिमेंट रस्त्याचे काम ज्या एसआरके कंपनीने केले त्यात पावसाळ्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे सालोरी जवळील नाल्याचे पाणी सरळ आजूबाजूच्या किमान पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक व कपाशी चे पीक वाहून गेले त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी सुद्धा मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे, या प्रसंगी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, तालूका अध्यक्ष वैभव डहाने, भद्रावती तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर, मनसे महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, शहर संघटिका ज्योती मुंजे शहर उपाध्यक्ष शुभांगी मोगरे, वरोरा शहर उपाध्यक्ष कुणाल, राम पाचभाई.राजेंद्र धाबेकर. गौरकार, कुलदीप श्रीरामे, प्रमोद हनवते व इतर मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांची उपास्थिती होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here