वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांचा भ्रष्टाचारी चेहरा येतोय समोर ? भ्रष्टाचाराची मालिका येत आहे समोर
वरोरा वन पंचनामा भाग -१
वरोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड हे एनकेन प्रकारे नेहमीच वादाच्या चर्चेत असतात व त्यांच्यावर वनविभागाच्या अनेक कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा होतं आहे. दरम्यान
वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांच्याकडून वनरक्षकाला इतर कर्मचाऱ्यांसमोर अर्वाच्य अश्लील व अश्लाघ्य भाषेत शिविगाळ करून चाकूने भोसकण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती वनरक्षक संदीप वाटेकर यांच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारी वरून दिसत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या या कृत्यामुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली असून, बुधवारी आरएफओविरोधात वनरक्षक संदीप वाटेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वळणावर असून राठोड यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या वनविभागाच्या अनेक कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे पुरावे आता समोर येत असल्याने वरिष्ठांकडून या प्रकरणी दखल घेण्याची शक्यता बळावली आहे.
वरोरा उपवनक्षेत्रांतर्गत रामपुर नियत क्षेत्राचे वनरक्षक संदीप दादाजी वाटेकर हे १४ सप्टेंबरला टेमुर्डा येथील वनपालांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड त्या ठिकाणी आले व उपस्थित कर्मचाऱ्यांसमोरच वनरक्षकाला शिविगाळ करीत चाकूने भोसकण्याची धमकी दिली. यापूर्वीसुद्धा आरएफओकडून अनेक कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार घडले असून, एखाद्या कर्मचाऱ्याचा वचपा कांढण्यासाठी राठोड हे कोणत्याही स्तराला जातं असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
लवकरच ठरणार राठोड विरोधात आंदोलनाची भूमिका.
टेमुर्डा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्याकडून झालेल्या कृत्यामुळे वनविभागात रोष व्यक्त केला जात असून, लवकरच आंदोलनाची भूमिका ठरविली जाणार आहे. दरम्यान, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोनकर यांची संघटनेमार्फत गुरुवारी भेट घेवून आरएफओ राठोड यांना निलंबित करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. चंद्रपूर वनवृत्तातील वनरक्षक व वनपालांनी संदीप वाटेकर यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आंदोलनाची भूमिका व न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका आहे.
तक्रारीत काय नमूद करण्यात आले?
वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची धमकी दिली जात असल्याने वनविभागातील संघटनाही आक्रमक झाल्या आहे. या प्रकरणी बुधवारी वनरक्षक वाटेकर यांनी या दरम्यान, वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यापासून असल्याची तक्रार केली आहे. आता या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक व स्थानिक पोलीस प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.