राठौड़ यांचेविरुद्ध विद्या झाड़े वनरक्षक सुर्ला व विजय रामटेके वनपाल वरोरा यांनी सुद्धा केली होती मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार.
वरोरा वन पंचनामा भाग -२
वरोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांचे विविध कामात भ्रष्टाचाराचे कारनामे समोर येत असताना त्यांचा त्यांच्या विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्याशी असलेला दुर्व्यवहार हा सुद्धा तितकाच धक्कादायक आहे. वनरक्षक संदीप वाटेकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांची मुख्य वन संरक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारी नंतर आता हळूहळू अनेक वन कर्मचारी व अधिकारी यांच्या तक्रारी समोर येत आहे त्यामुळं सेवानिवृत्ती पूर्वीच राठोड यांची दांडी गुल होते की काय ?असा शंका उपस्थित केल्या जातं आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या विरोधात यापूर्वी सुद्धा विद्या झाड़े वनरक्षक सुर्ला व विजय रामटेके वनपाल वरोरा यांनी मुख्य वनसंरक्षक यांचे कड़े तक्रार दाखल केली होती. सोबतच विद्या झाड़े यांनी महिला समिति कड़े सुद्धा या संदर्भात तक्रार केली होती पण राठोड यांनी पैशाच्या बळावर व आपल्या पदाचा गैर वापर करून ते प्रकरण दाबले होते. आता वाटेकर यांचे प्रकरण सुद्धा राठोड दाबतील कां ? याबाबत चर्चा आहे. नेहमीच मी म्हणेल तो कायदा अशी एकाधिकारशाही व्रुत्ति ठेवणाऱ्या राठोड ने अनेक कर्मचारी अधिकारी यांना नाहक त्रास व मानसिक छळ केल्याच्या घटना समोर येत आहे अशातच कोलाम यांचे मृत्यु प्रकरण आता उघड होणार असल्याने व माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती समोर आल्यानंतर भ्रष्टाचाराची पोलखोल होणार आहे.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे पदाधिकारी धडकले प्रधान मुख्य संरक्षक यांच्याकडे.
वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी वनरक्षक नरेश सिडाम याच्यावर जाणीवपूर्वक निलंबनाची कारवाई केली होती व पदाचा दुरुपयोग करून वाटेकर यांना सुद्धा त्यांनी धमकावलं असल्याने काल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) नागपूर यांच्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनाच्या पदाधिकारी यांनी निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. आता वाटेकर यांचे तक्रारी वरून वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात कोलाम वनपाल यांचे मृत्यु प्रकरण कोणते वळण घेणार,सेवानिवृत्त संजय कोल्हे कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.