Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे वरोरा व भद्रावती च्या टप्प्यावर होणार जंगी...

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे वरोरा व भद्रावती च्या टप्प्यावर होणार जंगी स्वागत.

राजप्रेमी व महाराष्ट्र सैनिक यांची उसळणार तोबा गर्दी.

वरोरा प्रतिनिधी :

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या कार्यक्रमात फेरबदल करण्यात आले असले तरी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील वरोरा येथील रत्नमाला चौक व भद्रावती येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेट जवळ आज दिनांक १९ सप्टेंबरला दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर ला जाताना थांबणार असून त्यांचे तिथे जंगी स्वागत होणार आहे.

दरम्यान मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या घरी दिनांक २० सप्टेंबरला दुपारी २.०० च्या दरम्यान येणार होते मात्र ऐन वेळेवर त्यांच्या दौऱ्याच्या वेळात बदल झाला असून आता राजसाहेब ठाकरे हे २० सप्टेंबरला पहाटे अमरावती कडे रवाना होणार आहे त्यामुळे वरोरा येथील राजूरकर यांच्या घरी होणारी सदिच्छा भेट होण्याची शक्यता कमी आहे मात्र तरीही राजसाहेब ठाकरे यांनी वरोरा येथे त्यांच्या घरी भेट द्यावी असा आग्रह महाराष्ट्र सैनिकांकडून होतं आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेला रमेश राजूरकर सारखा सक्षम व संयमी नेता मिळाला असल्याने व या क्षेत्रात सगळीकडे मनसेच्या शाखा बांधणी सुरू असल्याने वरोरा भद्रावती विधानसभेत मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. दरम्यान राजसाहेब ठाकरे यांची वरोरा येथे राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट झाल्यास मोठा फायदा मनसेला मिळत होता व त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली असती परंतु अमरावती येथे कार्यक्रम उरकून राजसाहेब यांना मुंबई ला त्वरीत पोहचायचे असल्याने त्यांची वरोरा येथील भेट तुर्तास होणार नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here