प्रहार पक्षाच्या अध्यक्षांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष असल्याची कुजबूज ?
चंद्रपूर प्रतिनिधी :–
नागपुर जिल्ह्यात कामठी तालुक्यातील लढवय्ये युवा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे प्रहार पक्षाचे छत्रपाल करडभाजने हे प्रहार चे जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या अन्यायकारक व हुकुमशाही ला कंटाळून कांग्रेसच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असताना आता चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा प्रहार सेवक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याने व पक्षाचे अध्यक्ष बच्चु कडू यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष असल्याने इतर पक्षात जाण्याची कुजबूज सुरू आहे.
छत्रपाल करभाजने यांनी सन 2017 ला माजी मंत्री बच्चु कडु यांच्या प्रहार पक्षात प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी वडोदा सर्कल मधील वडोदा, नाना मांगली, चिकना बोरगाव बिडगाव गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढवला. त्यानंतर सन 2019 ला छत्रपाल करभाजने यांनी प्रहार पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी सोनम करडभाजने यांना जि. प. निवडणुकीत उतरवले. त्यावेळी त्यांनी 1700 मते घेतली होती. सर्कल मधील जनतेचे राशन कार्ड विविध योजनांची कार्ड बनविणे आधार कार्ड शिबीर, रक्तदान शिबीर, स्थानिक कारखान्यात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे याकरिता त्यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरल्याने युवा वर्गात छत्रपाल प्रशिद्धिस आले पुढे त्यांनी स्वतः पंचायत समिती निवडणुक लढविली त्यात त्याने 2000 मते घेतली. परंतु अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला पण त्यांनी जिद्द सोडली नाही व नागपुर जिल्ह्यात सर्वात आधी प्रहार चा झेंडा कामठी तालुक्यात रोवन्यासाठी सज्ज असलेल्या छत्रपाल करडभाजने ने प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठे संघटन उभे केले मात्र काही दिवसापासून प्रहार चे जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे यांचेशी पटत नव्हते. रमेश कारेमोरे यांचेकडुन सातत्याने अन्याय होत असल्याची त्यांनी भावना त्यांनी व्यक्त करून प्रहार पक्षात आपले कुणी ऐकून घेत नसल्याची खंत व्यक्त करून काँगेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाचे एकेकाळी चांगले संघटन होते. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख हे निवडून आले होते. वरोरा भद्रावती तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे चांगले कार्यकर्ते तयार झाले होते दरम्यान मागील सन 2017 ला भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत प्रहार समर्थित उमेदवार प्रशांत कारेकर यांनी जोरदार टक्कर दिली होती. वरोरा तालुक्यात अनेक प्रहार सेवकांनी विविध आंदोलने घेऊन प्रशासनावर वचक निर्माण केली आहे व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधे प्रहार ची सत्ता पण आहे. खरं तर प्रहार जनशक्ती पक्षासाठी एवढे समर्पित कार्यकर्ते मिळाले असताना पक्षाचे अध्यक्ष बच्चु कडू किंव्हा त्यांनी नियुक्ती केलेले वरिष्ठ पदाधिकारी यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होतं असल्याने जिल्ह्यात कुठलाही पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला नाही पर्यायाने पक्षाचे काम कुठल्या स्थरावर करायचे व कुठले पदाचे लेटरपैड वापरायचे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रहार पक्षाची पूर्णता चंद्रपूर जिल्ह्यात ताकत कमी होऊन कार्यकर्ते इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.