Home मुंबई लक्षवेधी :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्राची कमाल.

लक्षवेधी :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्राची कमाल.

अंधेरी पोटनिवडनुकीतुन भाजप उमेदवारांची माघार, मात्र उद्धव ठाकरे गटाने मानले शरद पवारांचे आभार?

लक्षवेधी :-

असं म्हटल्या गेलं तर वावग ठरू नये की “कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा” कारण अंधेरी विधानासभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने  स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप ने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले होते, पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आठवण करून देत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजप ने लटके विरोधात निवडणूक लढवू नये अशी विनंती केली होती व त्या विनंती वरून भाजप ने आपल्या उमेदवाराला निवडणूक अर्ज मागे घ्यायला लावला पण उद्धव ठाकरे गटाने राजसाहेब ठाकरे यांचे आभार न मानता शरद पवारांचे आभार मानले हे उद्धव ठाकरे गटाच्या घाणेरड्या राजकारणाची झलक आहे असे म्हणावे लागेल.

एखाद्या आमदार खासदार किंव्हा नगरसेवकांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत जर संबंधित मृत्यू पावलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या पत्नी, मुलगा किंव्हा मुलगी निवडणुक लढवत असेल तर त्यांच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे व ती संस्कृती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जोपासली आहे, मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला मनसेने उमेदवारी देऊ केली पण राष्ट्रवादीने खेळी करून त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती, खरं तर मनसेने दुसरा उमेदवार दिला असता तर मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकला असता पण राजसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या घोडाबाजाराच्या कृतीला विरोध न करता असे म्हटले होते की “रमेश वांजळे यांच्या पत्नी विरोधात मनसेचा उमेदवार उभा न करणे हीच खरी रमेश वांजळे यांना श्रद्धांजली आम्ही वाहत आहो” महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी च्या खेळी नंतर भाजप ने सुद्धा खेळी केली व स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या पत्नी विरोधात उमेदवार ठेऊन तो निवडून आणला हा इतिहास आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने राजकीय संस्कृती ची कुणी नैतिकता पाळत असेल तर ते आहे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि म्हणूनच इतर राजकीय पक्षांनी अशीच महाराष्ट्राची राजकीय नैतिकता पाळावी यासाठी अंधेरी पोट निवडणुकीत भाजप ने उमेदवार ठेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र लिहिले आणि त्यामुळेच भाजप च्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला ही वस्तुस्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र शरद पवारांचे आभार मानतात मात्र राजसाहेब ठाकरे यांनीच अंधेरी पोटनिवडनुकीसाठी प्रथम पुढाकार घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे कृतघ्नता व्यक्त करत नाही म्हणजे भावाच्या एका पत्रामुळं उद्धव ठाकरे यांना निवडणूक न लढता विजय मिळाला असताना भावाबद्दल जो व्यक्ती साधा उल्लेख करत नाही त्यामुळं “कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा” असं राजसाहेब ठाकरे यांना आता वाटत असेल अशा प्रकारचा ट्वीट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा त्यांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे.

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे?

राजसाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडताना म्हटलं, “आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका,” असे ट्वीट करून राज ठाकरे यांनी आपले पत्र त्यासोबत जोडले आहे.

“रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते, शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांची पत्नी ऋतुजा लटके या आमदार होतील हे भाजपने पाहावे. त्या आमदार झाल्यावर दिवंगत नेत्याच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपली भावना आहे,” असंही राजसाहेब ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here