Home राजकारण मनसे वार्ता ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्ष पदी मयूर कुकडे.

मनसे वार्ता ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्ष पदी मयूर कुकडे.

प्रभागाच्या वतीने मयूर कुकडे यांचा सत्कार करून दिल्या शुभेच्छा.

नाशिक न्यूज :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मागील अनेक वर्षांपासून नाशिक शहरात काम करणारे व पक्षाची भूमिका सामाजिक माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणारे राजसैनिक मयूर कुकडे यांची प्रभाग क्रमांक २१ च्या शाखा अध्यक्ष पदी नुकतिच नियुक्ती करण्यात आली. त्याप्रसंगी विभाग अध्यक्ष विक्रम भाऊ कदम , महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे , शाखा अध्यक्ष सागर भाऊ घुगे , सहकार सेनेचे दिगंबर दराडे विल्सन साळवी अजय थोरात , भूषण दादा पोतदार , प्रियांका ताई पटेल , संगीता ताई शिरसाठ आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते .

मयूर कुकडे यांची शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभाग क्रमांक २१ च्या महाराष्ट्र सैनिक व मनसे पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“योग्य व्यक्ती ;सार्थ निवड”

कुठलीही व्यक्ती यश तेव्हाच संपादन करतो जेव्हा त्यांचे हितचिंतक यश मिळविण्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. आपल्या पक्षात शाखाध्यक्ष हे पद अत्यंत महत्वाचं पद आहे असं मला वाटत आणि त्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय ज्या व्यक्ती देऊ शकतात त्यांचीच आज निवड झाली असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक २१ च्या शाखा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर
मयूर कुकडे यांनी दिली.

Previous articleचिंताजनक:- रजेवर असणाऱ्या तलाठी राखी टिपले यांच्या कार्यालयाला नायब तहसीलदरांचे कुलूप ?
Next articleलक्षवेधी :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्राची कमाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here