Home राजकारण लक्षवेध :- वणी विधानसभा क्षेत्रात वंचितचे राजेंद्र निमसटकर देणार जोरदार टक्कर?

लक्षवेध :- वणी विधानसभा क्षेत्रात वंचितचे राजेंद्र निमसटकर देणार जोरदार टक्कर?

मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार निमसटकर जोमात.

वणी प्रतिनिधी :–

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजप, उबाठा, कांग्रेस बंडाखोर व मनसे नंतर वंचितच्या उमेदवार यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, एरवी भाजप विरुद्ध कांग्रेस अशी लढत होत असतांना आता पंचरंगी लढतीत या क्षेत्रातील जनता कुणाला निवडून आणतात हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला कळणारच आहे, पण वंचित चे राजेंद्र निमसटकर यांचा तिन्ही तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क आणि उत्कृष्ट पत्रकार व प्रभावी वक्ता म्हणून त्यांची असलेली ख्याती यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांना अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळतं आहे. दरम्यान गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा टाकलेला शिवसैनिक निमसटकर यांच्या रेलीत दिसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी मिळाली आहे. बोदकुरवार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये येथे विजय मिळविला होता. पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिल्याने यावेळी आपली विजयाची ‘हॅटट्रिक’ हाईल, असा विश्वास बोदकुरवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महाविकास आघाडीत वणीच्या जागेवरून वाद सुरू होता, मात्र अखेर शिवसेना उबाठाकडून येथे संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने वणी विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठीच सुटावा असा प्रयत्न चालविला होता व काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार हे येथून इच्छुक होते. मात्र यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये वामनराव कासावार या मतदारसंघात पराभूत झाले. दरम्यान काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून वणीतील उद्योजक, बँकर संजय खाडे हे प्रयत्नशील होते आता ते कांग्रेस बंडाखोर म्हणून निवडणूकीच्या रिंगणात आहे,

मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, लढवय्या पत्रकार, समाजसेवक आणि उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्यांची ख्याती आहे असे राजेंद्र निमसटकर यांना वंचित ने उमेदवारी दिल्याने वणी विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी, मनसे या प्रस्तापित उमेदवारांना जोरदार टक्कर देणारं अशी स्थिती निर्माण झाली आहे.  

वंचित बहुजन आघाडी यांच्या मतदारांनी जर आपले सर्वोच्य योगदान दिले आणि बहुजन समाजातील जागृत नागरिकांनी एका प्रभावी नेतृत्व करणाऱ्या व उत्कृष्ट वक्ता म्हणून राजेंद्र निमसटकर यांना पाठिंबा दिला तर येथील राजकीय समीकरण बदलणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here