चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा खरा कार्यकर्त्या ढसाढसा लडला : उमेदवारीचे धक्कादायक वळण….
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. या प्रक्रियेत ब्रिजभूषण पाझारे, जे मुनगंटीवारांचे खंदे समर्थक आहेत, उमेदवारीसाठी मोठ्या प्रयत्नात होते. मात्र, अंतिम क्षणी भाजपने विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना उमेदवारी जाहीर केली, ज्यामुळे पाझारेंचा हिरमोड झाला.
News reporter :- अतुल दिघाडे
पाझारे यांनी भाजपसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली, आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीसाठी दिल्लीपर्यंत गेले. तरीही, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि उमेदवारी मिळालेली नाही. किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना उमेदवारी दिली गेली.
या घटनामुळे पाझारे यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल करताना भावनिक झाल्यावर ढसाढसा रडले. त्यांचा हा दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाझारे हे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांच्या उमेदवारीमुळे जोरगेवार यांचे आव्हान अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर मतदारसंघातील राजकीय चित्रात ही घटना नक्कीच मोठा बदल घडवू शकते.