विदर्भ पटवारी संघाचा नायब तहसीलदार लोखंडे व मंडळ अधिकारी कन्नाके यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा.
वरोरा प्रतिनिधी :-
खांबाडा साजाच्या तलाठी राखी टिपले हया सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सेवेत नेहमीच अग्रेसर राहिल्याची माहिती असून या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले त्याची संपूर्ण शहनिशा करून शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नोंदी त्यांनी घेतल्या व शेवटच्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील होत्या मात्र दरम्यानच्या काळात त्यांची लोकप्रियता व संपूर्ण साजात अतिशय उत्तम व्यक्तीमत्व म्हणून त्या समोर आल्याने अनेकांची गोची झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे विदर्भ पटवारी संघाचे म्हणणे आहे.
कु. राखी टिपले हया खांबाडा साजावर दररोज उपस्थित राहून निस्वार्थी वृत्तीने काम करतात. या वर्षी खांबाडा सर्कल मधे आलेल्या महापुरात महीला असुन सुद्धा त्यांनी धडाडीने बचाव कार्य केले आहे. खांबाडा येथील सामाजिक कामात सुध्दा त्या नेहमीच अग्रेसीत असतात. तरी सुद्धा त्या रजेवर असतांना तलाठी कार्यालयाला नायब तहसीलदार लोखंडे व मंडळ अधिकारी कन्नाके कडून ग्रामपंचायत ला कोणतीही सुचना न देता तलाठी कार्यालयाला बेकायदेशीर रित्या , शासकीय नियमांचे उल्लंघन करून सिल ठोकले असल्याने विदर्भ पटवारी संघ उपविभाग वरोरा संघाचे वामन राजूरकर व ए. आर. पट्टावार हे पदाधिकारी संतापले असून जर महाराष्ट्र शासनाचे अधिकारीच असा प्रकार करायला लागले तर ग्रामीण जनतेने कोठे जावे? असा सवाल करून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात कठोर भूमिका घेऊन उपविभाग शाखा वरोरा येथील खांबाडा तलाठी कार्यालयाला लावलेले कुलूप ठोकणाऱ्या नायब तहसीलदार लोखंडे व मंडळ अधिकारी किन्नाके यांच्यावर कारवाई करा अन्यथा विदर्भ पटवारी संघातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.