Home वरोरा खळबळजनक :- वरोरा तालुक्यातील देशी दारू दुकाने बनले अवैध दारू पुरवठ्याचे अड्डे...

खळबळजनक :- वरोरा तालुक्यातील देशी दारू दुकाने बनले अवैध दारू पुरवठ्याचे अड्डे ?

गावागावांत अवैध देशी विदेशी दारूची सर्हास विक्री? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी वसुलीत मग्न ?

वरोरा प्रतिनिधी :-

जिल्ह्यात दारूबंदी असतांना गाव खेड्यावर अवैध दारू चोरट्या मार्गाने व पोलिसांच्या आशीर्वादाने येत होती पण आता चक्क परवाना धारक वाईन शॉपी, देशी दारूची दुकाने आणि बिअर बार मधून गाव खेड्यावर देशी विदेशी दारूचा बेकायदेशीर पुरवठा होतं असल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी हे देशी दारू दुकाने व बिअर बार मालकांकडून बेकायदेशीर हप्ता वसुली करीत असल्याची सनसनिखेज माहिती समोर आल्याने दर महिन्याला लाखों रुपयांचा माल हा पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या घश्यात जातं आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणांत दारू पिणायांचे प्रमाण वाढून हजारो संसार उध्वस्त झाल्याने जिल्ह्यात दारूबंदी व्हावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना व काही राजकीय पक्षातर्फे करण्यात आली होती, दरम्यान चंद्रपूर च्या गाव खेड्यातील महिलांनी नागपूर अधिवेशनाच्या काळात धडक देऊन तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्ह्यात दारूबंदी करायला भाग पाडले पण त्यानंतर महाविकास आघाडी चे सरकार सत्तेत येताच त्यांनी जिल्ह्यातील बहुचर्चित दारूबंदी उठवली पण आता अधिकृत दारू परवाने धारक हे अनधिकृत दारू विक्री च्या नादात गाव खेड्याच्या नागरिकांचा पुन्हा संसार उध्वस करत नाही कां ? असा प्रश्न निर्माण होतं आहे.

गावागावांत अवैध देशी विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय थाटात ?

जिल्ह्यातील दारूबंदी उठली आणि आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी नवी शक्कल लढवली.जिथे दारूबंदी च्या काळात पोलीस केस लागत असल्याने मोठ्या शिताफीने अवैध दारूचा व्यवसाय होतं होता पण आता तर प्रत्तेक गावांत अवैध दारू विक्रीची जणू दुकाने थाटल्या गेली की काय ? अशी विदारक परिस्थिती दिसत असून परवाने धारक देशी विदेशीदारूच्या दुकानातून आता राजरोसपणे बेकायदेशीर गाव खेड्यातविक्री करत आहे.आता ती कोण कोण आहेत कुणाचा वाटा कोणत्या देशी दुकानात आहे व गाव खेड्यावर कोण दारू पोहचवित आहे त्यांची नावे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन जाहीर करतील? नव्हे त्यानां त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी गोपनीय माहिती समोर येत आहे.

देशी दारू परवाना धारक दुकानदारांना गावखेड्यावर दारू विक्रीची परवानगी ?

वरोरा तालुक्यात मोजकी देशी दारूची दुकाने आहेत व शहारात एक वाईन शॉप आहे पण गाव खेड्यात या दुकानातून बेकायदेशीर देशी विदेशी दारू राजरोसपणे जातं असून यामागे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाचे पाठबळ आहे. कधी काळी दारूबंदी असताना दारूच्या एक दोन बॉटल साठी पोलीस केस करणारे पोलीस आता या अवैध दारूच्या व्यवसायाला संरक्षण देत आहे कां ?असा प्रश्न निर्माण होतं आहे. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आता तरी यावर प्रतिबंध लावून आपली जबाबदारी सांभाळणार की नेहमीच्या आपल्या कर्तव्यावर ठाम राहणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here