*लॅब टेक्निशियन वैद्यकीय क्षेत्रातील अविभाज्य घटक – आ. किशोर जोरगेवार*
*मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी असोसिएशनच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन*
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर,:- वातावरणातील बदल आणि भेसळ युक्त खाद्य पदार्थांचा मानवी आरोग्यावर मोठा विपरित परिणाम होत आहे. अशात नव नव्या आजारांचे प्रकार समोर येवू लागले आहे. या रोगाचा प्रकार शोधुन काढण्याचे काम लॅब टेक्निशियन करतो. त्यानंतरच रुग्णांवर योग्य उपचार केला जातो. त्यामुळे लॅब टेक्निशीयन हा वैद्यकीय क्षेत्रातील अविभाज्य घटक आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मेडीकल लॅबोरिटी टेक्नोलॉजी असोशीएशनच्या वतीने वन अकादमी येथे शैक्षणीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. किरण देशपांडे, डॉ. राजीव देवईकर, शाशिकांत खैरे, डॉ. संदिप झाडे, दीपक चंदनखेडे, प्रविण सुपारे, सतिश नक्षीने, डॉ. विमा निनावे, डॉ. प्रिती चव्हाण आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. या काळात देवदुताची भुमीका डॉक्टरांनी बजावली होती. डॉक्टरी पेशा हे सेवेचे माध्यम आहे. आजही अनेक डॉक्टर अंत्यत कमी शुल्क आकारत रुग्णांची सेवा करण्याचे काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रातही काळा नुसार अनेक बदल झाले आहे. तत्रज्ञाण विकसीत झाल्याने उपचार पध्दती सोपी झाली असली तरी या तंत्रज्ञाणाचा योग्य वापर करण्यासाठी डॉक्टरांनीही अपडेट राहिले पाहिजे. असे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
लॅब टेक्निशीयन वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचा घटक आहे. बरेचदा रोगाचे निदान होत नाही. अशात लॅब टेक्निशियन ची भूमिका महत्वाची ठरते. नेमका कोणता आजार आहे. याचे निदान लॅब टेक्निशीयन करत असतो. त्यानंतरच रुग्णावर त्या आजारा संबंधित उपचार केला जातो. त्यामुळे लॅब टेक्निशियन चे काम जबाबदारीचे आहे. आपणही हे काम जबाबदारी पूर्ण पार पाडावे. आज आपण आयोजीत केलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी. विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यशाळेतुन वैदकीय क्षेत्रातील बारीकी समजुन घेत याचा उपयोग रुग्णसेवेसाठी करावा. असे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला लॅब टेक्निशियन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.