Home चंद्रपूर बैल बंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी केेली कृषी महोत्सवाची सुरवात

बैल बंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी केेली कृषी महोत्सवाची सुरवात

बैल बंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी केेली कृषी महोत्सवाची सुरवात

कृषी महोत्सव

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर  कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनी, शेतमाल विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैलबंडी चालवत या महोत्सवाची सुरवात केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक नंदकुमार घोडमारे, नोडल अधिकारी , वरो-याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे आदींची उपस्थिती होती.
कृषी विभागाच्या वतीने शेतक-र्यांसाठी नियमीत कृषी मेळावे आयोजित केल्या जात आहे. यंदाही चांदा क्लब येथे कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनी, शेतमाल विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवत बैलबंडी चालवत महोत्सवाची सुरवात केली. आमदार स्वतः बैलबंडीवर स्वार झाल्याने उपस्थितही काही काळ चकीत झाले. त्यानंतर बैलबंडी हाकत आमदार किशोर जोरगेवार यांनी थोड्या दूर चालवत नेली. यावेळी असे आयोजन प्रयोगशील शेतक-र्यांसाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनीही या महोत्सवाला भेट देत शेतकरी शेतात कसा कष्ट करतो हे जाणून घ्यावे असे आवाहण नागरिकांना केले. प्रभात फेरी काढत सदर महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या प्रभात फेरीत शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here