Home चंद्रपूर क्रीडा महोत्सव

क्रीडा महोत्सव

चंद्रपूरात रंगत आहेत कुस्तीचे थरारक सामने, हॅन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपुर   श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेच्या प्रागंणात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुस्तीचा थरार नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टुंनी सहभाग घेतला आहे. तर सदर महोत्सवा अंतर्गत खुटाळा येथे आयोजित हॅंन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत विविध 10 ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांना सुरवात झाली आहे. दरम्याण काल सायंकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालीका प्रागंणात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यानंतर सदर सामन्यांना सुरवात झाली आहे. या सामन्यांमध्ये कुस्तीचे डावपेच पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीपट्टूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये रंगत भरली आहे. जिल्ह्यात प्रथमच आयोजित राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. खुटाळा येथे हे आयोजन संपन्न होत आहे. या स्पर्धेत मुंबई, नाशीकसह राज्यभरातील संघानी सहभाग घेतला आहे. तर सकाळी योग आसन प्रतियोगितेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन नंतर सुरवात झाली आहे. जिल्हा क्रिडा संकुल येथील बॅंडमिंटन स्पर्धेचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. घुग्घूस येथे क्रिकेट सामन्यांनाही सुरवात झाली असुन येथे नांमाकीत 16 संघानी सहभाग घेतला आहे. रय्यतवारी येथील सिआरसी मैदानात सुरु असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतचा आज तिसरा दिवस असुन येथे राज्यभरातील संघानी सहभाग घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजाता वरोरा नाका येथे स्केटींग स्पर्धा घेण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. चंद्रपूरात आयोजित हा क्रीडा महोत्सव क्रीडा प्रेमींसाठी मेजवानी ठरत आहे.

*आमदार अभिजीत वंजारी यांनी दिली श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाला भेट*

नागपूर पदविधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी आज शुक्रवारी क्रीडा महोत्सवाला भेट देत महापालीका प्रांगणावर सुरु असलेल्या कुस्ती सामन्यांचा आनंद घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल, श्रीफळ, माता महाकालीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेला हा श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून देणार आहे. यातून नावोदिद स्थानिक खेळाडूंना खेळातील बारिकी शिकायला मिळणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच या क्रीडा महोत्सवाला आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यावेळी माजी नगरसेवक नंदु नागरकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धक भाग्यश्री फंड, प्रतिक शिवणकर, बाळू कातकर यांच्यासह ईतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती….

Previous articleबैल बंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी केेली कृषी महोत्सवाची सुरवात
Next articleशिवजयंती महोत्सव व्याख्यान कार्यक्रमानिमित्त रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांचा सन्मान सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here