शहरातील अनेक शैक्षणिक शिकवणी संस्थांच्या आवारात कारवाई सुरू
अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी
– चंद्रपुरात अंडर एटीन (18) मध्ये असलेल्या मुला मुलींवर धडक कारवाई मोहीम ट्रॅफिक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी वाघमोडे यांच्या आदेशाने आज नागपूर रोड येथील ईनसाईड इस्टुडन्ट समोर कारवाई करण्यात आली आणि येथील विद्यार्थी विद्यार्थिनी अंडर एटीन (18) च्या अंदर असणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करून गाड्या जमा करण्यात आलेल्या आहे. चंद्रपुरात वाढती ट्राफिक व वाढते अपघात त्यात कमी वय असताना पालक आपल्या मुलांना गाडी हाती देत असतात आणि या मुलांचे ना तर लायसन्स असतात आणि नाही गाडी बदल कोणत्याही प्रकारची माहिती म्हणजे कोणी यांच्या समोर आले की अपघात नक्की कारण यांनि वळणावर कधि इंडिकेटर देत नाही हॉर्न वाजवत असतात कारण यांना गाडीबद्दल माहितीच नसते याच कारणामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढत चाललेले आहे.
वारंवार निर्देश आणि सूचना देऊनही पालक नियम धाब्यावर ठेवून आपल्या मुलांना कमी वयांत गाडी हातात देत आहे. म्हणून आता चंद्रपुरातील पोलीस निरीक्षक पाटील यांनी चंद्रपुरात मोहीम चालू केलेली आहे. आणि या मोहिमेत अंडर एटीन (18) वरील सर्व मुलामुलींवर व त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येईल आणि जास्तीत जास्त मोठे रकमेची फाईन देण्यात येईल व फाईन न भरल्यास पालकांना तीन वर्षाची कारावास होऊ शकतो हे फाईन अथवा कारवाई नुसते पैसे जमा करण्यासाठी नाही तर पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात गाडी हातात न देण्याकरता समजूत आहे. आणि वाढत्या अपघातावर नियंत्रण करण्याच्या एक भाग आहे. तरी पालकांनी आपल्या अंडर एटीन (18) मुला-मुलींना आपले वाहन देण्यास टाळावे आणि आपल्या मुलांचा व दुसऱ्याचा अपघात होण्यास वाचवावे असे सूचना चंद्रपुरातील पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी वाघमोडे यांनी माहिती दिली. आज ईनसाइट इन्स्टिट्यूट मध्ये कारवाई करण्यात आली त्यावेळेस उपस्थित पोलीस कर्मचारी मध्ये परागे,ताजने, राम राठोड, व महिला पोलीस ज्योती कांबळे यांनी हजर राहून येथील (18) पेक्षा कमी वयातील विद्यार्थी विद्यार्थिनीवर कारवाई करण्यात आली.