Home चंद्रपूर भूमिपुत्राची हाकच्या बातमीचा दणका जनता कॉलेज चौकातील नालीचे बांधकाम करण्यास सुरुवात

भूमिपुत्राची हाकच्या बातमीचा दणका जनता कॉलेज चौकातील नालीचे बांधकाम करण्यास सुरुवात

 

 

अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :-  नागपूर रोड जनता कॉलेज चौकातील मुख्य मार्गावरील नालीचे स्लॅप पूर्णपणे कोसळले होते. परंतु या नालीवर म,न,पा, प्रशासनाचे किंवा P, W, D, अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते आणि या परिसरात साई मंदिर,जनता कॉलेज आणि मुख्य म्हणजे या नालीच्या समोर अत्यावश्यक मेडिकल,झेरॉक्स, किराणा दुकान,व खाद्यपदार्थाचे दुकान आहे. या नालीवरचे स्लॅब कोसळल्यामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांना जणू अपघाताचे आमंत्रणच दिल्यावाणी होत होते. यांची दक्षता घेता भूमिपुत्राची हाक या साप्ताहिक मध्ये व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून  दिनांक 27,,08,,2023,,ला न्यूज प्रकाशित केली आणि न्यूज लावतास दोन दिवसांत येथील मनपा प्रशासन व P, W, D अधिकाऱ्यांना जाग आली आणि या नालीचे बांधकाम करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून येथील नागरिकांनी व दुकानदाराने मानले आभार

Previous articleथांबा, तुमच्या मुलांचे वय 18 वर्षे व्हायचे आहे ट्राफिक पोलिसांची होणार धडक कारवाई
Next articleदेशाचे भवितव्य घडवायचे असेल तर ह्या तरुणाईला घातक व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करणे अपरिहार्य आहे.”मोहम्मद इरफान शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here