Home चंद्रपूर देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर ह्या तरुणाईला घातक व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करणे...

देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर ह्या तरुणाईला घातक व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करणे अपरिहार्य आहे.”मोहम्मद इरफान शेख

अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूर.
अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
:-  अलिकडे चंद्रपूर शहर हे अत्यंत संवेदनशिल शहर म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी अंमली पदार्थ व बनावट तंबाखूमुळे मानवी शरीर अक्षरशः पोखरुन निघत आहे. उद्याच्या भारताचे प्रतिनिधित्व करणारी पिढी व्यसनाधिनतेच्या ह्या विघातक सापळ्यात पुरती अडकलेली आहे.
त्यामुळे आम्हाला या देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर ह्या तरुणाईला घातक व्यसनांच्या ह्या विळख्यातून मुक्त करणे अपरिहार्य आहे. त्यानुषंगाने समाजविघातक अशा अंमली पदार्थांचा अनिर्बंध व्यापार आणी बनावट रासायनिक तंबाखूचा अवैध कारभार मूळसकट नश्ट करावाच लागेल. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णाची लक्षणीय अशी भयचकित करणारी वाढ झालेली आहे.
यावर त्वरेने पायबंद न बसल्यास आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा कधी या कॅन्सर सारख्या भीषण रोगाच्या विळख्यात सापडतील याचा अंदाज देखिल करता येनार नाही , इतकी भयावह परिस्थिती चंद्रपुरात निर्माण झालेली आहे.
खरे तर महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू व्यापारावर बंदी असून देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खुलेआम राजरोसपणे विक्री केल्या जात आहे. कायदेशीर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नशिले पदार्थ कसे काय बाजारात येऊ शकतात आणि येत असेल तर यात कोणाकोणाचे हितसंबंध आहेत? कोणाकोणाचे हात गुंतले आहेत? कोणकोण ह्या बेकायदा व समाज विघातक राश्ट्र विघातक धंद्याच्या फैलावास जबाबदार आहेत हे जनतेपुढे स्पश्ट झालेच पाहिजे. व कायद्याव्दारे त्वरेने यांना ठेचले गेले पाहिजे .
अन्यथा चंद्रपूर शहरातील उद्याची देश घडवणारी तरुण पिढी या पद्धतीने बेचिराख झाल्यास इतिहास आपल्यापैकी कुणालाही माफ करणार नाही हे तितकेच दाहक सत्य आहे.
आज आपली मुले लहान आहेत त्यामुळे त्यांना आज बऱ्या – वाइटाचे काहीच ज्ञान नाही. कुठल्या बाबी घातक व कुठल्या पोषक आहेत याची जाण त्यांना नाही. पण जेव्हा त्यांना जाणीव होईल की तेव्हा त्या प्रश्र्न विचारणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देऊ शकणार आहोत? याचा आज विचार करणे आपल्या जबाबदार पालक पिढीला अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी एक समाजशिल व्यक्ती आणी संघटना म्हणून शहरातील पुरोगामी,परिवर्तनवादी व मानवतावादी संघटनांनी एकत्रीत येउन सदर विषयावर गांभीर्याने चर्चा करून या समस्येवर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय विश्राम येथे दिनांक 2 सप्टेंबर ला बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर समीर एन् कदम, डॉक्टर पी वी मेश्राम, डॉक्टर सूरज प्रकाश बियाणी, अधिवक्ता देवा पाचभाई, सचिन पाटिल , प्राचार्य अनिल ए डहाके, अधिवक्ता राम मेंढे , मंथन सुभाष नगराळे, विलास मथनकर उपस्थित होते. बैठकीला सामाजिक समता संघर्ष समितीचे कादर शेख शोहेल अतिकुर रहमान शेख ,हर्षल कानमपल्लीवार ,विनोद अनंतवार, सौरभ धोंगले, रुस्तम छोटे खान ,उपस्थित होते बैठकीला डी .एस ख्वाजा सरिता मालू शुभम एस उपरे साईराम आत्माराम मडावी शेखर तावाडे महेश कुमारे नितीन भाऊ उदार प्रवीण पंचबुधे अरहंत नगराळे मंथन सुभाष नगराळे सय्यद चांद पाशा यांची प्रमुखतेने उपस्थिती होती ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here