Home क्राईम स्टोरी शहरातील मुख्य गोल बाजार परिसरात गळा चिरून हत्या

शहरातील मुख्य गोल बाजार परिसरात गळा चिरून हत्या

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  आज दिनांक 03, सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील मुख्य गोल बाजार परिसरात भिख मांगणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली.

65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक मांगत होता.

सदर घटना ही सकाळी 07,00 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली,

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. मृतक मधुकर वर तीक्ष्ण व धारदार हत्याराने वार केल्याची माहिती आहे.

गोल बाजार परिसरातील दुकानदार मधुकर ला नामदेव म्हणून हाक मारीत होते, मात्र आता या घटनेनंतर गोल बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहर पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत आदि दाखल झाले होते.

Previous articleदेशाचे भवितव्य घडवायचे असेल तर ह्या तरुणाईला घातक व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करणे अपरिहार्य आहे.”मोहम्मद इरफान शेख
Next articleचंद्रपूर शहर पोलिसांची कामगिरी 24 तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपीस केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here