Home क्राईम स्टोरी चंद्रपूर शहर पोलिसांची कामगिरी 24 तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपीस केली अटक

चंद्रपूर शहर पोलिसांची कामगिरी 24 तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपीस केली अटक

शहरातील गोल बाजार परिसरात हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस केली अटक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात दोन सप्टेंबर रोजी झालेल्या भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. भूषण उर्फ अजय शालिग्राम असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण हा दोन सप्टेंबर रोजी दुपारनंतर चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका गुन्ह्याच्या आरोपातून सुटला होता. गावाला परत जाण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गोल बाजार परिसरात राहणाऱ्या एका भिकाऱ्याकडून पैसे हिसकावले. त्या भिकाऱ्याने प्रतिकार केला असता आरोपीने भिकाऱ्याला पाठमोरी करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याकडून पैसे हिसकावून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. आरोपी हा मूळचा मुल तालुक्यातील चीरोलीचा रहिवासी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मागील काही दिवसांपासून तो चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. शनिवारी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा एकदा खुणाचा गुन्हा केला आहे.या घटनेमुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलिस या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here