Home चंद्रपूर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला दिली धडक

भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला दिली धडक

 

अपघातात दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दिनांक 04,,09,,2023, ला सकाळी 10,,00 ते 10,,30 च्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहणाऱ्या होत्या,

त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 04 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षिका ठाकरे ह्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ11GC-0824 ने ठाकरे यांच्या दुचाकी वाहन क्रमांक MH34 BS 4977 ला धडक दिली.

या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Previous articleचंद्रपूर शहर पोलिसांची कामगिरी 24 तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपीस केली अटक
Next articleचिंताजनक :-शिवा विश्वकर्मा नावाच्या बोगस डॉक्टरवर कारवाई का नाही ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here