एका खाजगी रुग्णालयात कॅम्पाउंडर म्हणून काम करीत असलेल्या ह्या बोगस डॉक्टरकडे रुग्ण होतात भरती ?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सर्वत्र सुळसुळाट असल्याच्या बातम्या नेहमीच वाचायला मिळतं असतांना चंद्रपूर मधील एक बोगस डॉक्टर चक्क स्वतःच्या घरी रुग्णालय खोलुन बसला असुन तिथे रुग्ण भरती सुद्धा करत असल्याने आरोग्य खात्यात नेमकं चाललंय काय ? हा प्रश्न निर्माण होतो. अगोदरच डॉक्टर म्हणजे देवदूत अशी ओळख असतांना त्यांच्याकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट बघता कधी कधी ते यमदूत वाटायला लागतात अशातच ज्यांच्याकडे आरोग्य खात्यातील कुठलीही पदवीचं नसतांना त्यांच्याकडून जर रुग्ण उपचार घेत असतील तर मग पदवी कशासाठी घ्यावी ? व या पदवीसाठी लाखों रुपये खर्च करायचे कशासाठी ? इत्यादी प्रश्न उभे राहत आहे.
शिवा विश्वकर्मा हा बोगस डॉक्टर मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या एका भागात आपल्यां स्वतःच्या घरी दवाखाना खोलुन बसलाय. दरम्यान आपले बिंग फुटू नये म्हणून शहरातील एका नामांकित डॉक्टर कडे तो कॅम्पाउंडर म्हणून पार्ट टाईम काम करतो, कोरोना च्या काळात लाखों रुपये त्यांनी कमावले असुन अनेक रुग्णांना उपचार दिले खरे पण हाताबाहेर गेलेल्या केसेस त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय ऐवजी खाजगी रुग्णालयात पाठवून तिथे पण त्यांनी कमिशन कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्या पैशाच्या बळावर स्वतःच्या मुलाला डॉक्टरचे शिक्षण देऊन अधिक्रुतरीत्या डॉक्टरांची मान्यता पण मिळविण्याच्या ते तयारीत असुन याकडे आरोग्य विभागाचे अक्षम दुर्लक्ष की चिरीमिरी देऊन कारवाई होत नाहीत का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार असुन या बोगस डॉक्टरांची पोलखोल आता त्यांच्या जेल वारीची तयारी होईल असेच एकूण चित्र असुन लवकरच पुराव्यासह यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित.