अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- नागपूर रोड जनता कॉलेज चौकातील मुख्य मार्गावरील नालीचे स्लॅप पूर्णपणे कोसळले होते. परंतु या नालीवर म,न,पा, प्रशासनाचे किंवा P, W, D, अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते आणि या परिसरात साई मंदिर,जनता कॉलेज आणि मुख्य म्हणजे या नालीच्या समोर अत्यावश्यक मेडिकल,झेरॉक्स, किराणा दुकान,व खाद्यपदार्थाचे दुकान आहे. या नालीवरचे स्लॅब कोसळल्यामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांना जणू अपघाताचे आमंत्रणच दिल्यावाणी होत होते. यांची दक्षता घेता भूमिपुत्राची हाक या साप्ताहिक मध्ये व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 27,,08,,2023,,ला न्यूज प्रकाशित केली आणि न्यूज लावतास दोन दिवसांत येथील मनपा प्रशासन व P, W, D अधिकाऱ्यांना जाग आली आणि या नालीचे बांधकाम करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून येथील नागरिकांनी व दुकानदाराने मानले आभार