Home धक्कादायक डॉ. भूषण वाढोणकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करण्याऱ्यायांची गोदिया येथे आत्महत्या.

डॉ. भूषण वाढोणकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करण्याऱ्यायांची गोदिया येथे आत्महत्या.

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

माळीपुरा  :-  अमरावती रोड, चांदूर रेल्वे शहरातील विलास वाढोणकर यांचा मुलगा भूषण वाढोणकर हा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गोदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होता,

मात्र सोमवारी भूषणचे वडील विलास यांना भूषणने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच विलास वाढोणकर हे त्यांचे कुटुंबीय व मित्रांसह आज 5 सप्टेंबर रोजी गोदिया येथे गेले. डॉ. भूषण वाढोणकर यांचे पार्थिव चांदूर येथे आणून हिंदू रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

एवढे मोठे टोकाचे पाऊल का उचलले ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. . विलास वाढोणकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा भूषणने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते तर मुलगी डॉक्टर होत आहे. या होतकरू नवोदित डॉक्टरने असे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here