Home चंद्रपूर मनसे जनहित कक्ष विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश काळबांधे व सुनील गुढे.

मनसे जनहित कक्ष विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश काळबांधे व सुनील गुढे.

अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा सन्मान.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता चांगले दिवस येतं असुन पक्षाच्या अनेक अंगीकृत संघटना बांधणीतून पक्ष संघटना बांधणी जोरात सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विभागाचे अध्यक्ष अँड किशोर शिंदे व सरचिटणीस महेश जोशी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तीन तीन विधानसभा क्षेत्रात एक जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले असुन त्यात चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रात रमेश काळबांधे तर वरोरा चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुनील गुढे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जनहित कक्ष व विधी कक्ष विभागाच्या मोर्चेबांधणीतून पक्ष मजबूत करण्यासाठी सरचिटणीस महेश जोशी हे विशेष परिश्रम घेत आहे. त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत समन्वय करून जनहित कक्ष विभागाच्या माध्यमातून जनहिताचे काम करा असा आदेश दिला आहे. दरम्यान जिल्ह्यात मनसेचे पदाधिकारी नियुक्ती करण्याचे काम आणि गावागावात व शहरातील वार्डावार्डात शाखा बांधणीचे काम पक्षाचे प्रमुख पदाधिकारी करत असल्याची माहिती असुन जनहित कक्ष विभागाच्या माध्यमातून पक्षाला बळकट करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे आणि सुनील गुढे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here