Home चंद्रपूर मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा एक हात द्या माणुसकी ग्रूप

मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा एक हात द्या माणुसकी ग्रूप

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दिनांक 08,09,2023 ला निराधार महिलेची प्रकृती गंभीर असल्याची आणि त्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याची माहिती  माणुसकी ग्रूप मधील विशाल रामगिरवार ला मिळाली. सदर महिला बंगाली कॅम्प परिसरात राहते .आज दुपारी 12,00, च्या सुमारास संबंधित महिलेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी माणुसकी ग्रूप ची संपूर्ण टीम गेली महिलेची प्रकृती फार गंभीर होती.

त्या शेवटच्या satege ला होत्या.तरी त्यांना सेवाग्राम किंवा मेघेसावांगी येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करता येणार का काही होऊ शकते का या उद्देशाने डॉ. रामटेके यांना तपासणीसाठी बोलावण्यात आले.त्यांनी तपासणी झाल्यावर सांगितले की या महिला शेवटच्या स्टेज ला आहे.

आणि या वेळी डॉ. रामटेके यांनी निःशुल्क सेवा दिली व पुढील वाटचालीत पण सेवा देऊ असे माणुसकी ग्रूपला सांगितले आणि आता काही होऊ शक्यत नाही. नंतर त्याचा मुलाला दिलासा देऊन मदतीचा साथ देऊन पुढील वेळेस सोबत राहु अशे सांगून सायंकाळी 4.00 वाजता जड अंतःकरणाने या महिलेस सुदृढ प्रकृती लाभावी ही प्रार्थना करून माणुसकी ग्रूप ची टीम परत आली. माणुसकी टीम कडे माहिती आल्यावर योग्य ते प्रयत्न करून आपले कर्तव्य पार पाडण्यात आले.

माणुसकी हीच खरी ईश्वर सेवा, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा एक हात द्या.असे माणुसकी ग्रुप ने या वेळी सांगितले व आपल्यास कोणी निराधार व्यक्ती आढळल्यास माणुसकी ग्रुपशी संपर्क साधावा. आम्ही शक्य ती मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू अशे या वेळी सांगण्यात आले.🙏

Previous articleमनसे जनहित कक्ष विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश काळबांधे व सुनील गुढे.
Next articleआई-वडिलांना घरातून काढणे पडेल महागात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी दिला निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here