Home Breaking News आई-वडिलांना घरातून काढणे पडेल महागात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी...

आई-वडिलांना घरातून काढणे पडेल महागात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी दिला निर्णय

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बल्लारपूर  :-  येथील दीनदयाल वॉर्डातील रहिवासी जानकीदेवी लक्ष्मण मांझी यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टला बल्लारपूर न्यायालयाने सुनावणी केली. त्यांची सून व मुलाला वडिलांचे राहते घर खाली करून दर महिना चार हजार रुपये आई- वडिलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बल्लारपूर पेपर मिलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण मांझी यांनी पंडित दीनदयाळ वॉर्डात घर विकत घेतले व पत्नी तसेच आपला मुलगा आणि सुनेसह राहू लागले; परंतु, काही दिवसानंतर मुलगा व सुनेने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.

हा त्रास असहनीय झाल्यानंतर जानकीदेवी मांझी यांनी महिला अधिनियमचे कलम १९ चे अंतर्गत अँड. सुनील पुरी यांच्या माध्यमातून मुलगा जितेंद्र मांझी व सून मीना मांझी यांच्या विरोधात बल्लारपूर न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायाधीश अनुपम एस. शर्मा यांनी निर्णय देताना मुलगा व सुनेला दोन महिन्यांच्या आत घर खाली करण्याचा आदेश दिला व मांझीचा मुलगा जितेंद्र याला दर महिना चार हजार गुजराण भत्ता आई वडिलांना देण्याचा आदेश दिला. मुलगा व सून यांना त्यांच्या घरी न जाण्याचे आदेश दिले. वयोवृद्ध जानकीदेवी यांची पैरवी अॅड. सुनील पुरी यांनी केली.

Previous articleमेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा एक हात द्या माणुसकी ग्रूप
Next articleभद्रावती तालुक्यात शिवपांधन रस्त्यांची रेती माफियांनी लावली वाट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here