Home भद्रावती भद्रावती तालुक्यात शिवपांधन रस्त्यांची रेती माफियांनी लावली वाट.

भद्रावती तालुक्यात शिवपांधन रस्त्यांची रेती माफियांनी लावली वाट.

तहसीलदार यांच्या आशीर्वादाने रेतीच्या अवैध वाहतूक व रेती साठा.शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सुद्धा तहसीलदार यांचे मौन का ?

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील मांगली गाव परिसरातील शासनाने बनवून दिलेल्या पांधन रस्त्यांची त्या रस्त्याने येणाऱ्या जडवाहतूक व रेतीचे ट्रॅक्टर ट्रक यामुळे पूर्णता दुर्दशा झाली असुन शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जायची मोठी पंचाईत झाली आहे. दरम्यान शेतातील कामे करण्यासाठी त्या ठिकाणी पायदळ जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे आणि मग शेतात पिकांना खते देण्यासाठी ती खते शेतात न्यायाची कशी ? हा यक्ष प्रश्न पडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यांची झालेली दुर्दशा यासाठी अवैध रेती वाहतूक करणारे वाहन चालक जबाबदार असल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतर सुद्धा तहसीलदार मौन का ? असा प्रश्न आता विचारल्या जाऊ लागला आहे.

भद्रावती तालुक्यात रेती माफिया सक्रिय झाले याचा अर्थ तहसीलदार यांच्या बिना परवानगीने ते झाले नसावे मग ज्याअर्थी काही शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन या परिसरातील जडवाहतूक बंद करण्याची व ते खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची विनंती केली तर तहसीलदार यावर का कारवाई करत नाही आणि रेती माफियांच्या गाड्या या मार्गाने बंद का करत नाही ? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला असुन यावर त्वरित मार्ग निघाला नाही तर येथील शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार देऊन प्रसंगी आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here