Home धार्मिक चंद्रपुरातील गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय

चंद्रपुरातील गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन  2023 आणि इद ए मिलाद हे दोन्ही सण 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी येत आहेत. यामुळे दोन्ही सणांचे उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण होणार होती. मात्र, मुस्लिम समाजाच्या निर्णयाने ही अडचण दूर झाली आहे.

हे सण उत्साहात साजरे व्हावे यासासाठी इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न निघता 29 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे होण्यास मदत होईल. दादमहाल मदरसा येथे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि मशीद प्रमुख यांची बैठक पार पडली.

या बैठकीत गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव चंद्रपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरे व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न काढता 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.या निर्णयाचे चंद्रपूर शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम सलोखा वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here