अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- दी.२३ सप्टेंबर २०२३ रोजी डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर, येथे अतिशय साध्या पद्धतीने स्पंदन रोहनकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण माणुसकी ग्रुप सदस्य तसेच रोहनकर फॅमिली उपस्थित होती.
काही दिवसा आधी रोहनकर यांनी माणुसकी ग्रुप शी संपर्क साधून स्वतःच्या मुलाचा १७ वा वाढदिवस माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. रोहनकर आणि त्यांचे कुटुंब नेहमीच आपल्या मुलांचा वाढदिवस सामाजिक सकल्पनेतून साजरा करत असतात असे त्यांनी सांगितले माणुसकी ग्रुपच्या टीमने
डेबू सावली वृद्धाश्रम शी संपर्क साधून या कार्यक्रमासाठी तारीख आणि वेळ निश्चित केली. ठरल्याप्रमाणेदि, 23,09, ला कार्यक्रम यशस्वीरीता पार पाडण्यात आला. वाढदिवसानिमित्त डेबू सावली वृद्धाश्रमात ज्या अत्यंत आवश्यक व जीवनोपयोगी वस्तूं लागणार त्या सर्व वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्पंदन शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे उपस्थित न्हवता मात्र त्याच्या कुटुंबीयांनी ही समाज सहयोगाची परंपरा कायम ठेवत निराधार वृद्धांना मदत करीत आपले सामाजिक कार्य व जबाबदारी पार पाडली.वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत स्पंदन चा वाढदिवस साजरा झाला.
यावेळी माणुसकी ग्रुप टीम दलीतमित्र आदिवासी सेवक तथा साप्ताहिक बहुजन ललकार चे संपादक डी.के.आरिकर, शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, सामाजिक कार्यकर्त्या निशा धोंगडे, स्पंदनचे आईवडील प्रा.विजय रोहनकर व वैशाली रोहनकर, रंजना आरिकर तसेच माणुसकी ग्रूप ची संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थिती होती.
माणुसकी ग्रुपचा संदेश
आजचा हा वाढदिवसाचा उपक्रम गरजूंना उपयोगी वस्तू आणि रोहनकर फॅमिली तथा माणुसकी ग्रूप च्या सामाजिक कार्यकर्त्यांना भरभरून आशीर्वाद आणि आनंद देऊन गेला. या वाढदिवसाचा कार्यक्रम संपूर्ण रित्या माणुसकी ग्रुप कडून ऑर्गनाईज करण्यात आलेला होता तरी एखाद्या नातेवाईकाचा किंवा स्वतःचा वाढदिवस अश्या सामाजिक रित्या साजरा करण्याची इच्छा असेल तर माणुसकी ग्रुपशी संपर्क साधावा असे या वेळी
माणुसकी ग्रुप चंद्रपूर..तर्फे सांगण्यात आले.
संपर्क -8055407941/8999645084