Home भद्रावती धक्कादायक :- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून लवकरच पायउतार ?

धक्कादायक :- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून लवकरच पायउतार ?

महायुतीत भाजपची किरकिरी झाल्याने अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ?

राजकीय कट्टा :-

सद्ध्या महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या बेकायदेशीर सरकार विरोधात जनतेत कायदेशीर राग आहे, कारण जिथे राज्याचा विकास महत्वाचा असताना भाजप कडून जी विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी सुरू आहे तीं जनतेला सुद्धा पटली नाही, त्यामुळं भाजपवर जनतेचा मोठा आक्रोश आहे व राज्यात भाजप ची सर्वत्र किरकिरी होतांना दिसत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात विधानसभेचे सभापती नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्याच्या आत यासंदर्भात अहवाल सादर करा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा विषय लांबणीवर टाकत राहण्याची भाजप आणि शिंदे गटाची चाल अपयशी ठरली आहे. परिणामी आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल देणे अपरिहार्य असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आणि दहाव्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसू शकतो. आणि कायदेतज्ज्ञ म्हणतात की शिंदे सह 16 आमदार अपात्र ठरतील याचा अर्थ जर एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरले तर उर्वरित 24 आमदार सुद्धा अपात्र ठरतील म्हणजे शिंदे सरकार पडेल. दरम्यान दुसरी बाजू ही आहे की उर्वरित 24 आमदारांनी भाजप प्रवेश घेतला तर भाजप ची आमदार संख्या वाढेल व त्यानंतर फडणवीस  किंव्हा अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. कारण खरंच 16 आमदार अपात्र ठरले तर हे सरकार पडेल म्हणून भाजप ने अगोदरच अजित पवारांवर 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप असतांना सुद्धा भाजप ने त्यांना जवळ केलं आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री बनवलं. याचा अर्थ भाजप नेत्यांना सुद्धा अगोदरच माहीत होत॑ की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार आणि म्हणूनच भाजपच्या गोटात रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून हा भाजपला  पुढचा पहिला पर्याय असेल. याशिवाय भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपकडून आपले पुढील पत्ते उघड केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या आठवड्यात  महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागल्यास भाजप त्यांचे कशाप्रकारे पुनर्वनस करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची लवकरच माळ पडणार असल्याची राजकीय विश्लेषकाकडून चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here