Home गडचिरोली शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट.

शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट.

शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा

डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा व सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास भेट देऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली व विषबाधा झालेल्या मुलींच्या प्रकृती संदर्भात चौकशी करून विचारणा केली.
वसतिगृहात अनेक बाबींची कमतरता आहे. शुद्ध पाण्याचे आर. ओ. खराब झाले असून वसतिगृह अधीक्षकांनी मागणी केल्यावर सुद्धा दुरुस्ती किंवा नवीन आर. ओ. चा पुरवठा करण्यात आलेला नाही. पूर्णवेळ प्रशिक्षित परिचारिकाची नियुक्ती नाही. वसतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त विध्यार्थी आहेत. प्रशासनाने संबंधित प्रकरनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार पुढे घडू नये यासाठी ठोस पावले उचलावी व तात्काळ वसतिगृहात नियमित सेवा देणारी निवासी परिचारिका व वेळोवेळी सेवा देणारे तज्ञ डॉक्टर, प्राथमिक उपचाराकरिता औषधी पुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याकरीता अत्याधुनिक RO लावावे व क्षमतेपेक्षा अधिक मुली असल्यामुळे नवीन इमारत सुद्धा लवकरात लवकर बनवण्यात यावी अशी मागणी डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.
यावेळी सोबत माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, पत्रकार हेमंत डोरलीकर, सरपंच पुनमताई किरंगे, शेवंताबाई हलामी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here