महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्याने पोलीस स्टेशन सावली च्या वतीने
‘चला एकत्र येऊया..’ या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- सावली तालुका-७ जानेवारी ला पार पडलेल्या अंतिम सामन्यात सावली पंचायत समितीने प्रथम येत चषक पटकवीला तर सावली पोलीस स्टेशनने द्वितीय स्थान पटकाविला.*
*महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या संकल्पनेतून सदभावना क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे दुसरे वर्ष आहे. तालुक्यातील पत्रकार संघ, पोलीस विभाग, तहसील विभाग, सरपंच संघ, पोलीस पाटील संघ, पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आपदा संघ, व्यापारी संघ, चालक मालक संघ अशा 16 संघानी सामन्यात सहभाग घेतला. अंतिम सामना पंचायत समिती सावली व पोलीस स्टेशन सावली यांच्यात चुरस झाली. यात पंचायत समितीने विरोधी संघातील सर्व खेडाळू बाद करीत चषक पटकावीला. पोलीस स्टेशनने दुसरा क्रमांक पटकावीला. बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे हस्ते करण्यात आले.*
*