राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला सुसंस्कृत बनवून व्यसनमुक्ती कडे नेणारे – आ. किशोर जोरगेवार श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत सेवा महिला व पुरुष मंडळच्या वतीने संत स्मृती मानवता दिवस महोत्सवाचे आयोजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला सुसंस्कृत बनवून व्यसनमुक्ती कडे नेणारे – आ. किशोर जोरगेवार
श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत सेवा महिला व पुरुष मंडळच्या वतीने संत स्मृती मानवता दिवस महोत्सवाचे आयोजन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- तुकडोजी महाराज हे आत्मसाक्षात्कार करणारे संत होते. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये भक्ती आणि नैतिक मूल्यांचा पूर्ण भाव आहे. त्यांचे जीवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांनी लोकांच्या स्वभावाचे समीक्षेने निरीक्षण केले आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना मार्गस्थ केले. त्यांचे विचार समाजाला सुसंस्कृत बनवून वेसनमुक्तीकडे नेणारे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत सेवा महिला व पुरुष मंडळच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण अर्थात संत स्मृती मानवता दिवस महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधीकारी अॅड. दत्ता हजारे, ग्रामगीताचार्य दादाजी नंदनवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, हरिदास कापटे, प्रकाश कसर्लवार, मिलिंद आश्राम, पुरुशोत्तम राउत, डॉ. शेंडे, रेखा शेंडे, प्रदीप खांडरे, अरुणा कावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले कि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामद्वार, ग्रामविकास, स्वावलंबी, ग्रामनिर्मीती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनविले. अनेकात एकत्व शोधतांना गाव खेड्यामध्ये संकल्पना रुजविण्याचे त्यांनी काम केले. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे समाज उपयोगी विचार समोर नेण्याचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जात आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमात पहिले लोकांची संख्या कमी दिसायची मात्र आता हि परिस्थिती बदलत चालली आहे. आजच्या या कार्यक्रमात लोकांचा सहभाग लक्षणीय आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामिण भागाच्या विकासावर जोर दिला. आपलाही ग्रामीण भागाचा विकास प्रमुख उद्दिष्ट राहिला आहे. यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येथे मुलभुत सोयी सूविधांसह समाज भवन, पांदण रस्ते आणि विशेषतः अभ्यासिकांचे काम सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संतभक्त, कवी व समाजसुधारक होते. त्यांनी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर भ्रमंती करुन अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. त्यांचे हे कार्य आपण पूढे नेण्याचे काम करत आहात. यातही विषेश म्हणजे आपण सातत्य ठेवले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आपल्या या समाजउपयोगी कार्यात लोकप्रतिनिधी म्हणुन आपल्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.