Home क्राईम स्टोरी दखलपात्र :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्या भ्रष्ट नितीचा शासनाला कोट्यावधीचा फटका.

दखलपात्र :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्या भ्रष्ट नितीचा शासनाला कोट्यावधीचा फटका.

शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांना वाचविण्यासाठी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणीचा अहवाल दडपला.

मात्र उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याचे दिले आदेश.

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्या भ्रष्ट कारणाम्याचे अनेक प्रसंग समोर आले असून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लाच घेण्याच्या त्यांच्या सवयीने एका तेलंग नावाच्या कर्मचाऱ्याला कारागृहाची हवा खावी लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता, दरम्यान त्या प्रकरणात स्वतः तहसीलदार आरोपी असून स्वतःला वाचविण्यासाठी त्यानी त्या कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याचे बोलल्या जात आहे, भद्रावती तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध रेती व गौण खनीज उत्खनन तहसीलदार यांच्या आदेशाने सुरु असून ज्यांनी पैसे दिले त्यांना खुली सुरु तर ज्यांनी त्यांच्या आडून रेती व गौण खनिज वाहतूक व उत्खनन केले त्यांच्यावर कारवाई होतं असल्याचा प्रकार सुरु आहे. दरम्यान तहसीलदार सोनवणे यांच्या या भ्रष्ट नितिमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडाविल्या जात असल्याचा प्रकार स्पष्ट दिसत आहे मात्र या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकड़े वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नसल्याने तहसीलदार सोनावणे डेरिंग वाढली असल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यापूर्वी शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांनी भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन करून कोट्यावधीचा शासन महसूल बुडवला असल्याची बाब उघड झाल्यानंन्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या दरम्यान उपाविभागीय अधिकारी यांनी त्या जागेचे मोजमाप करण्याचे आदेश दिले होते, त्या दरम्यान नायब तहसीलदार, मंडळं अधिकारी व तलाठी यांच्याद्वारे सदर जागेचे मोजमाप करण्यात आले होते, ते गौण खनीज उत्खनन कोट्यावधी रुपयाचे असल्याने व यात तहसीलदार सोनवणे यांचा शामकांत थेरे यांच्याशी प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांनी मोजमाप करण्याचा हा अहवाला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर न करता तो परस्पर दडपला होता मात्र मनसे च्या तक्रारीनंतर आता उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी तहसीलदार सोनवणे यांना पत्र पाठवून तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

तहसीलदार सोनावणे शामकांत थेरे वर का करत नाही कारवाई?

भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन करून कोट्यावधीचा शासन महसूल बुडवला असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदार सोनवणे यांनी शामकांत थेरे यांच्या मोजमाप झालेल्या जागेच्या गौण खनिजावर दंड आकारणी करून अवैध गौण खनिज उत्खनन करताना ज्या पोकलेनं व जेसीबी मशीनचा वापर कारण्यात आला व वाहतूक करणाऱ्या सर्व हायवा ट्रक ची जप्ती करण्यात यायला हवी होती परंतु अगोदरच सोनवणे व शामकांत थेरे यांचा जो आपसात आर्थिक करार झाला होता त्यामुळे जाणीवपूर्ण त्यांनी कार्यवाही केली नाही हे आता उघड झाले आहे. त्यामुळे शासनाला मिळणारा कोट्यावधीचा शासन महसूल बुडवला जात असल्याने याबाबत मनसे कडून कारवाई करण्याचा आग्रह उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरु आहे.

तहसीलदार सोनवणे या अगोदर सुद्धा वादात? तहसीलदार अनिकेत सोनवणेंच्या चौकशीचे आदेश

आदिवासींची जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्याच्या प्रकरणात भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनावणे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत शिवसेना प्रणित कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांनी तक्रार केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ही तक्रार वरोरा उपविभागीय अधिकारी लंगडापुरे यांच्याकडे वर्ग केली व याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते पण त्याबाबतीत नेमकं काय झालं हे गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here