मोखळा येथे डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:-सावली तालुका मौजा.मोखाळा येथे डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा उदघाटनाचा कार्यक्रम माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटनुरवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,सरपंच सौ.प्रणिता म्हशाखेत्री यांच्या हस्ते पार पडले.*
*आज मोखाळा येथे ६००-७०० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ५०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे.या शिबिराप्रसंगी उदघाटक म्हणून बोलताना दिनेश पाटील चिटणुरवार यांनी “मा.ना.श्री.विजयभाऊ७ वडेट्टीवार यांचे लोककार्य कार्य नेत्रदीपक आहेत,आज ब्रम्हपुरी क्षेत्रात अनेक कॅन्सरग्रस्त,शोषित पीडित,शेतकरी व महिलांसाठी विविध सेवाभावी आरोग्य,नेत्र तपासनी व चष्मे वाटप,मोतीबिंदू शिबिर, कॅन्सर तपासणी शीबीर व रोगनिदान मेळावे घेत आहेत,प्रत्येक गावाच्या विकासासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने ते जनसेवक आहेत,असे प्रतिपादन त्यांनी केले.*
*या शिबिराप्रसंगी ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळ्याचे अध्यक्ष मा.अनिल पाटील म्हशाखेत्री, उपसरपंच मा.विनोद पोहणकर,माजी सरपंच मा.मारोती राऊत,व्याहाड खुर्दचे माजी सरपंच व ग्रा.प.सदस्य मा.केशव भरडकर,लोंढोली ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे, काँग्रेस कार्यकर्ता मा.राजू थेरकर,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,ग्राम पंचायत सदस्य मोखाळा मा.विलास रोहणकर,सौ.शालूताई डोंगरे,सौ.अस्मिता मुळे,सौ.अश्विनी तिवाडे,सौ.जयश्री.फाले तसेच माजी ग्रा.प.सदस्य सौ.माया चांदेकर तसेच सौ.वनिता भोयर तसेच मा.बादल गेडाम,मा.प्रफुल दुधे,मा.महेश रायपूरे,मा.मंगेश चुनारकर आदी उपस्थित होते.*