मोखाळा येथे भव्य दिवस- रात्र कबड्डी स्पर्धा
युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करावी- दिनेश पाटील चिटणुरवार
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:-सावली तालुका राजे शिवछत्रपती युवा क्रीडा कबड्डी मंडळ मोखाळा यांच्यातर्फे भव्य दिवस रात्र कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे उदघाटन माजी बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांनी केले तर अध्यक्षस्थानी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने होते,कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सरपंचा सौ.प्रनिताताई मशाखेत्रि यांच्या हस्ते झाले.*
*स्पर्धेच्या उदघाटनिय स्थानावरून बोलताना माजी बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांनी “कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. या खेळाला आंतरराष्टीय स्थरात पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा हात आहे. विशेष म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे ज्या मध्ये पुरुष व महिला या दोघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. गेल्या काही वर्षा मध्ये प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळणं रससंजीवनी मिळाली आहे.मोठमोठ्या कलाकार आपापल्या विकत घेत आहे.युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करावी असे ते म्हणाले.*
*कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळ्याचे अध्यक्ष मा.अनिल पाटील म्हशाखेत्री,उपसरपंच मा.विनोद पोहणकर,ग्राम पंचायत सदस्य मोखाळा मा.विलास रोहणकर,सौ.शालूताई डोंगरे,सौ.अस्मिता मुळे,सौ.अश्विनी तिवाडे,सौ.जयश्री.फाले,मा.भुवन पा.सहारे,मा.रवी पा.तिवाडे,पोलीस पाटील मा.पत्रू भोयर,गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.सचिन दुधे,सौ.वनिता भोयर,मा.रुमाजी रोहनकर,मा.हरीजी चिवडे तसेच आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*