पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन उलट शेतकऱ्यांनाच पोलीस स्टेशन मध्ये बोलावले.
शेतकऱ्याना मोबदला न देताच तार जोडणीचे जबरदस्तीने काम सुरु असताना शेतकरी झाले आक्रमक.
वरोरा प्रतिनिधी :-
करनून ट्रान्समिसन लिमिटेड (डब्लू के टी. एल) कंपनीच्या माध्यमातून ट्रांसमिशन लाइनच्या बांधकाम ब तार जोडणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतातून टाकण्यात येत असलेल्या या तार जोडणीच्या दरम्यान शेतापिकांचे नुकसान व्ही जागेचा मोबदला म्हणून जी ठराविक रक्कम मोबदला म्हणून शेताकऱ्यांना देण्याचा करार कंपनीने केला असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याना मोबदला न देता परस्पर काम केले आहे व काही काम बाकी आहे, या दरम्यान शेतकऱ्यांनी अनेकांवेळा स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व जागेचा मोबदला मिळवून देण्यासाठी तक्रारी केल्या पण कंपनीकडून कुठलेही सकारात्मक उत्तर आले नाही व शेताकऱ्यांना मोबदला न देता कंपनीच्या कर्मचारी टॉवर लाईनचे काम सुरु करण्यासाठी निलजई या गावात आले असता शेतकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना पकडून त्यांना आपल्या ताब्यात ठेवले व तुम्ही आमच्या शेतीचा मोबदला देण्यासाठी तुम्हच्या मालकाला सांगा अन्यथा तुम्हाला सोडणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान वरोरा पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तावडीतून कंपनी कर्मचाऱ्यांना सोडवले व शेतकऱ्याना पोलीस स्टेशनं मध्ये आज हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान व जमिनीचा मोबदला त्यानां मिळवा या करिता मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मोहित हिवरकर व जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारण्यात आला असून ज्याअर्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसताना कंपनी कर्मचारी कुठल्या कायद्याने काम करताहेत हेच कळायला मार्ग नसून पोलिसांनी याबाबत सकारात्मक उपाय करून कंपनीच्या मालकांना बोलावून शेताकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे.