Home चंद्रपूर चंद्रपूर च्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी प्रशांत विघ्नेश्वर.

चंद्रपूर च्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी प्रशांत विघ्नेश्वर.

सर्वसामान्य सदस्य ते अनेक पदे भूषवून त्या पदाला न्याय देणाऱ्या प्रशांत विघ्नेश्वर यांचे सर्वत्र होतं आहे अभिनंदन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या काल दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत 2023-24 या वर्षासाठी नविन कार्यकारिणीची निवडणूक पार पडली असून चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी योगेश चिंधालोरे, सचिव पदी प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली. या संघाच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सर्व निर्वाचित पदाधिकारी यांचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठा व जनतेला आपले मत मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा श्रमिक पत्रकार संघ मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख अबाधित ठेऊन आहे. या श्रमिक पत्रकार संघाला अनेक दिग्गज पत्रकारानी सोडचिट्ठी दिल्यानंतर सुद्धा येथील काही पत्रकार मंडळींनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे, अशातच या पत्रकार संघाच्या भव्य इमारतीच्या पायाभरनी पासून तर त्या इमारतीच्या निर्माण कार्यापर्यंत सतत या पत्रकार संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या खांद्याला खांदा लावून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत जनसंपर्क ठेवणारे प्रशांत विघ्नेश्वर यांनी श्रमिक पत्रकार संघाचे सर्वसामान्य सदस्य ते विविध पदे भूषवून संघाला उभारनी देण्याचे काम सातत्याने केले आहे व आता त्यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here