Home चंद्रपूर आवाहन :- कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मत देऊ नका? महिलांचे आवाहन.

आवाहन :- कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मत देऊ नका? महिलांचे आवाहन.

ज्यांचे दारूचे धंदे आहेत तेच निवडणुकीत उभे आहे,त्यांच्यापासून संसार उध्वस्त होतं असल्याने चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याचे महिलांचे आवाहन.

चंद्रपूर :-

आमच्या लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत दारूचे व्यसन लागून कुटुंब उध्वस्त होतं आहे, आम्ही महिला वेळोवेळी दारू विक्री करणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार देऊन सुद्धा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही, दारूबंदी प्रशासन गावातील दारू बंद करू शकत नाही असे असताना आता दारूची दुकानें सुरु करणाऱ्या महिलाचं लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या असल्याने पुन्हा दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होईल व आमचे कुटुंब उध्वस्त होईल म्हणून दारूची दुकाने व बार चालविणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांना निवडून देऊ नये एक चांगल्या व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन चिकणी गावातील महिलांनी मतदारांना केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या राऊत आडनावाच्या उमेदवार गावागावात राशन दुकानातून स्वस्त दारू विक्री करण्यात येईल असा जाहिरानामा काढतो तर दुसरीकडे दारूची दुकानें व बिअर बार कांग्रेस उमेदवार प्रतिभा धनोरकर यांच्याकडून चालवली जातं आहे, त्यामुळे जनतेच्या मरणाची दारू दुकानें चालविणाऱ्यांना निवडून देऊ नये असे धक्कादायक आवाहन महिलांनी केले आहे व तसा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर चांगलाच व्हायरलं झाला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू विक्री होतं असल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीकडून कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतं आहे, दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या कुटुंबातील व्यक्तीचा परिवार हा मानसिक दृष्टीने खचला असतो व त्याचा संपूर्ण भार हा महिलांवर पडत असल्याने दारू विरोधात महिला आक्रमक असतात, अशातच गावोगावी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे व लहान मुलांपासून तर मोठ्या बुजुर्ग व्यक्तीपर्यंत दारूचे व्यसन लागले आहे त्यामुळे दारूच्या व्यवसनाने कुटुंब उध्वस्त होतं आहे. अशातच प्रत्येक गावातील महिला आमच्या गावात दारू विक्री होऊ नये म्हणून संघर्ष करीत असतांना आता लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचेच दारू दुकानें व बार मोठया प्रमाणात असल्याने त्यांना निवडून देऊ नका चांगल्या व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन महिलांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here