अधीक्षक संजय पाटील च्या बेहिशोबी संपत्ती सह थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांच्याही संपतीची चौकशी करा, मनसेची मागणी.
चंद्रपूर :-
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना नवीन बिअर शॉपी च्या परवण्यासाठी 1 लाख रुपयाच्या लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला, त्यामुळे आता पुढे काय? हा गंभीर प्रश्न असून त्यांच्यासोबत काम करणारे व वसुलीच्या हिस्यात भागीदार असणारे थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांची चौकशी झाली का ? दरमहा प्रत्येक बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकान मालकाकडून पाच हजार ते तीस हजार रुपये एवढी रक्कम वसुली करणारे वरील अधिकारी यांनी अधीक्षक संजय पाटील यांच्यासोबत मिळून मोठी माया जमवली याचीही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करणे आवश्यक आहे,
दरम्यान वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्याकडे वरोरा भद्रावती चिमूर ब्रम्हपुरी नागभीड सिंदेवाही इत्यादी तालुक्यातील नवीन जुने बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी, देशी दारू दुकानें यांना परवाने देण्यासाठी किंव्हा दुकाने स्थानांतरित कारण्याकरिता स्पॉट पंचनामा अर्थात अहवाल तयार करण्याचे काम होते, मात्र यांनी कुठलीही मोका चौकशी न करता परस्पर पैसे घेऊन अनेक बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकानाना बनावट केसेस बनवून परवाने दिल्याची बाब आता उघड झाली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरील बोगस अहवाल व परवाने संदर्भात अँड शुक्ला यांनी पिटीशन दाखल केली आहे,
भद्रावती येथील दोन देशी दारू दुकान, वरोरा येथील बोर्डा चौकातील देशी दारू दुकान, ब्रम्हपुरी येथील वाईन शॉपी व व्याहाड येथील वाईन शॉपी हे सगळे नियम धाब्यावर बसवून स्थानांतरित करण्यात आले, त्यांचा अहवाल हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांनी तयार केल्याने त्यांनी या प्रकरणात लाखों रुपयाची माया संबंधित व्यवसायिकाकडून मिळवली असल्याचा आरोप आहे, त्यामुळे अधीक्षक संजय पाटील च्या बेहिशोबी संपत्ती सह थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांच्याही संपतीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.