Home चंद्रपूर ब्रेकिंग :- पोहायला गेलेल्या एका युवकांचा लालपेठ कॉलरी जवळील पाण्याच्या खड्ड्यात बुडून...

ब्रेकिंग :- पोहायला गेलेल्या एका युवकांचा लालपेठ कॉलरी जवळील पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू.

उन्हाच्या कडक्यात थंडीचा आनंद घेण्याच्या नादात जीव गमावला, सर्वत्र हळहळ.वनविभागाने खड्डा केल्यानंतर सुद्धा कुंपण न केल्याने युवकाचा अंत. नुकसान भरपाई देण्याची मागणी.

चंद्रपूर :-

दुर्गापूर येथील तनवीर शेख वय 19 वर्ष हा लालपेठ कॉलरी क्रमांक 2 मध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला असता त्या भागात वेकोली व वनविभागाच्या जागेत खोदलेल्या एका 40-30 चौरस फूट आराजी असलेल्या खड्ड्यात उष्णतेच्या तीव्रतेने थंडीचा आंनद घेण्यासाठी मित्रांसोबत पोहायला गेला असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी 1 ते 1.30 ची असून मृतदेह शोधण्यासाठी चंद्रपूर मनापाच्या रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या बोटीच्या साहाय्याने तब्बल तीन तासानंतर मृतदेह हाती लागला. या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होतं आहे, मात्र एवढा मोठा खड्डा खोदताना वनविभागाने त्या खड्ड्याच्या सभोंवताला कुंपण घातले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे वन विभागाकडून मृतक च्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी होतं आहे.

शहरातील लालपेठ कॉलरी नंबर दोन मध्ये खुली जागा असून तिथे वनविभागाने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत जवळपास एक हेक्टर जागेवर झाडे लावण्याचे काम हातात घेऊन भूमिगत कोळसा खान बुजाविण्याच्या कार्यात रेती व माती जी टाकल्या जाते त्यात पाणी पण सोडल्या जाते ते पाणी साठवणूक करून त्या पाण्याच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी मोठा खड्डा खोदला होता त्या खड्ड्यात पाणी असल्याने दुर्गापूर येथील काही युवक जे लालपेठ कॉलरी येथे आले होते त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी पाण्यात उडया मारल्या दरम्यान काही युवक बाहेर आले पण एक युवक तनवीर शेख हा खड्ड्यात बुडाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here