अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) मुम्मका सुदर्शन यांनी आज सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर बदल करण्यात आले आहेत.
या निर्णयानुसार बल्लारपूरचे एसएचओ आसिफ राजा शेख यांची रामनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रामनगरचे एसएचओ सुनील गाडे यांना बल्लारपूर पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले आहे.
बल्लारपूरचे एसएचओ आसिफ राजा शेख यांची रामनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती. रामनगरचे एसएचओ सुनील गाडे आता बल्लारपूर पोलिस ठाणे सांभाळतील. नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, कोठारीसह अनेक भागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या.
पोलीस स्टेशनचे अधिकारी संदीप आकडे यांची सायबर सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली.या शिवाय नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, कोठारीसह जिल्ह्यातील अनेक भागातील पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी एसएचओ संदीप आकडे यांची सायबर सेलमध्ये बदली करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी आणि गुन्हेगारी नियंत्रण मजबूत व्हावे या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारून पोलिसांचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असे एसपी मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले.
या मोठ्या फेरबदलामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांना नवीन पोलिस ठाण्यांकडून नव्या अपेक्षा असून त्यांच्या भागात सुरक्षा व शांतता राहील अशी अपेक्षा आहे,