अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेचा निधी अपलोड एसएमएस ( SMS ) प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातील ब्यालेन्स एकदा तपासण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, असे आढळून आले आहे,
की काही लाभार्थींना त्यांच्या आधार कार्ड लिंकिंगच्या समस्यांमुळे किंवा मोबाईल नंबर आणि बँक खाती जुळत नसल्यामुळे त्यांना निधी प्राप्त झाला नाही.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, लाभार्थींनी त्यांच्या KYC औपचारिकता पूर्ण कराव्यात आणि त्यांचे आधार कार्ड त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी व ब्याकेतील अकाउंटला लिंक करावे अशी विनंती केली जाते. यामुळे योजनेचे लाभ अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री होईल.”