Home चंद्रपूर सूमठाणा येथे जंगल सफारी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

सूमठाणा येथे जंगल सफारी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर येथे जंगल सफारी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्प, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सूमठाणा व राजे शिवबा ग्राम संघ (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना जंगल सफारी करून घेण्यात आली व त्यांना वृक्षाचे महत्व माहिती होण्यासाठी माहिती देण्यात आली. तसेच राखीच्या पर्वावर वृक्षांना राखी बांधून त्यांचे महत्व समजवण्यात आले.

या कार्यक्रमात अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी रजनी खानोरकर, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक डॉ. श्री मधुकर कोटनाके, शिक्षिका वैशाली भोयर, श्री. मारोती झाडे, श्री. भाऊराव बोंडे, श्री. विनोद मेश्राम, वनरक्षक संदीप तोडासे, सीआरपी समीक्षा सोयाम, ग्राम संघ अध्यक्ष लक्ष्मी येरने, आदींसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here