चाळीसच्या वर कंत्राटी सुरक्षा रक्षक बेरोजगार करून प्रशासन काय साध्य करतंय?
चंद्रपूर :-
जिल्हा सामान्य रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले, मात्र एवढ्या मोठ्या मेडिकल कॉलेज मध्ये रुग्ण भरती होत असतांना तिथे सिटी स्कॅन काढायची म्हटलं तरी खाजगी रुग्णालयात जावे लागते, सोबतच अनेक चाचण्या करण्यासाठी इथे वैद्यकीय उपकरणे आहेत, मात्र सुरु नाही अशी स्थिती असून इंजेक्शन औषधी बाहेरच्या मेडिकल मधून विकत घेऊन आणावी लागतेय तर मग मेडिकल कॉलेज असून फायदा तो काय? अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत असून जिथे कंत्राटी सुरक्षा रक्षक काम करत होते त्यांना काढून या रुग्णालयात महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स (सुरक्षा दल) कशासाठी? हा प्रश्न उभा राहत असून त्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांना तात्काळ सेवेमध्ये सामील करा अशी मागणी होत आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करिता कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले परंतु तिथे पायाभूत सुविधा आणि सगळ्या प्रकरच्या औषधी नाही, डॉक्टर चिट्ठीवर लिहुन दिलेल्या औषधी विकत घ्यावा लागत आहे काय यासाठी मेडिकल कॉलेज काढण्यात आले अश्या संतप्त प्रतिक्रिया जनसामान्य माणसात आहे त्यातच स्थानिकांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार मिळाला तो रोजगार सुद्धा हिरावून घेतल्या जातं असेल तर या शासन प्रशासनाविरोधात जनता रस्त्यावर उतरणार अशी स्थिती आहे.