Home चंद्रपूर दखल :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित पावडे यांचे सर्वत्र...

दखल :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित पावडे यांचे सर्वत्र कौतुक.

मृत्यूसी झुंज देत असलेल्या महिलेला स्वतःसह मित्रांचे रक्तदान करून जीव वाचविण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न, रुग्णांचे कुटुंब गहिवरले.

वरोरा /चंद्रपूर :-

दुःखात संकटात जो धावून जातो तोच खरा समाजसेवक असतो, पण सद्याच्या काळात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी गोरगरीब दुःखी पीडितांना मदत देण्याच्या नावाखाली समाजसेवक असल्याचा टेंभा मिरविणारे तथाकथित राजकारणी याचं मोठं पीक आलं आहे, कुणी छत्र्या वाटताहेत, कुणी चष्मे वाटताहेत, कुणी देवांच्या मुर्त्या दान करून भक्तीचा आव आणत आहे तर कुणी महिलांचे मेळावे लावून तर कुणी लाडकी बहीण योजणांचे फॉर्म भरून समाजसेवेच्या नावाखाली राजकारण करत आहे. मात्र वरोरा तालुक्यात असाही एक समाजसेवक आहे ज्यांनी आजपर्यंत अनेकांना कुठलाही स्वार्थ न ठेवता मदतीचा हात दिला आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनकार्य करणारे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित पावडे यांचे अशाच एका मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे,

वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वरोरा कृषी बाजार समितीचे संचालक अभिजीत पावडे हे त्यांच्या मित्रासह चंद्रपूर येथे खाजगी कामासाठी गेले असता त्यांना अंकुर हॉस्पिटल चंद्रपूर येथून फोन आला की रुग्णालयात भरती एका महिलेला रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे, त्यांनी लागलीच अंकुर हॉस्पिटल गाठलं जिथे त्यांना रक्त द्यायचं होतं, रुग्ण महिलांचे नातेवाईक तिथे होते त्यांच्या समक्ष स्वतःचे एक बॉटल रक्त दिलं व त्यांच्या दोन मित्रानी पण रक्तदान केलं, मृत्यूच्या दारात टेकलेल्या महिलेच्या अंगात रक्त गेलं आणि त्या महिलेला हवं तेवढं रक्त मिळाल्याने तीची प्रकृती सुधारली त्यामुळं तिच्या कुटुंबातील नातेवाईकांनी अभिजित पावडे यांच्यासह त्यांचे मित्र व्यंकटेश जगापल्ली, सुशांत धोकरे यांचे आभार मानले, त्यावेळी त्यांचे मन गहिवरले.

त्या स्वार्थी राजकारणी संधीसाधू राजकीय नेत्यांच्या गालावर तमाचा?

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढण्यास सज्ज असलेले संभावित उमेदवार यांच्या करामती बघितल्या तर असं वाटायला लागतंय की एवढी वर्ष हे समाजसेवक होते कुठं? या संभावित उमेदवारांच्या उमेदवारी मिळायच्या अगोदर निवडणूक प्रचार गाड्या गावागावात अशा अशा घिरट्या मारताहेत जणू यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि हेच पक्के उमेदवार आहे, त्यासाठी ते गावकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित कारण्यासाठी आरोग्य तपासणी करिता आरोग्य शिबीर, चष्मे, छत्र्या, विद्यार्थ्यांना बुक पुस्तके पेनी वाटप तर गावकऱ्यांना सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली पैसे वाटप करत आहे, पण यांचं चित्र आणि चरित्र बघितलं तर हे सर्व कारण्यामागे त्यांचा स्वार्थ दडला आहे, पण अभिजित पावडे सारखा एक सामाजिक कार्यकर्ता संकटात सापडलेल्या रुग्ण महिलेला स्वतःचे रक्त देऊन तीचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो ही खरी समाजसेवा आहे आणि त्या या समाजसेवेच्या घटनेने त्या स्वार्थी संधीसाधू राजकारणी यांच्या गालावर हा तमाचा आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here