Home वरोरा संस्कृती :- वरोरा तालुक्यातील मोवाडा पिंपळगाव येथे गौरी पुजनाचा अनोखा कार्यक्रम,

संस्कृती :- वरोरा तालुक्यातील मोवाडा पिंपळगाव येथे गौरी पुजनाचा अनोखा कार्यक्रम,

गावातील मुलं मुली, महिला पुरुष मंडळी डीजेच्या तलावार थिरकल्या, गावात जत्रेच स्वरूप.

वरोरा प्रतिनिधी.
धनराज बाटबरवे :-

तालुक्यातील पिंपळगाव (मारुती) आणि मोवाडा या दोन गावात मोठ्या संख्येने कहार समाजाच्या माध्यमातून गौरी पुजनाचा दरवर्षी कार्यक्रम होतं असून याही वर्षी रक्षाबंधनाचे औचित्य साधून दिनांक 20 /8/ 2024 रोज मंगळवार ला कहार समाज पुरुष आणि महिला भगिनींनी परंपरेनुसार राखी ह्या सणाला गौरी पूजन घेऊन डीजे च्या तलावार मिरवणूक काढण्यात आली,

कहार या समाजात राखी हा सण सर्वात मोठा सण मानला जातो व त्यांच्या समाजाची परंपरा टिकून राहावी म्हणून मोठ्या प्रमाणात समाजातील बंधू आणि भगिनी तसेच लहान बालगोपाळ व युवा पिढी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमाला लाभत असतें तसेच येणाऱ्या काळात सुद्धा समाजाची ही परंपरा टिकून राहावी यासाठी मार्गदर्शन केल्या जाते, दरम्यान या समाजाची सांस्कृतिक वाटचाल चालू राहणार व येणाऱ्या पिढीला सुद्धा समाजाची परंपरा याची जाणीव करून देत राहणार हेच आमचे ध्येय असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here